चोपड्यात महसूल अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला!, ट्रॅक्टर मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल


खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यावर थेट ट्रॅक्टरखाली ओढून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तलाठी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ट्रॅक्टर मालक आणि चालकाविरुद्ध चोपडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील बुधगाव परिसरातील नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार मंडल अधिकारी, तलाठी जडे आणि इतर पाच कर्मचारी या ठिकाणी तपासणीसाठी गेले. पथकाने घटनास्थळी काही ट्रॅक्टर वाळू उपसा करताना पाहिले. अधिकाऱ्यांची चाहूल लागताच काही वाहने अंधाराचा फायदा घेत पसार झाली. मात्र एक ट्रॅक्टर महसूल पथकाच्या ताब्यात आला.

पथकाने तो ट्रॅक्टर जप्त करून तहसीलदार कार्यालयात नेण्यास सुरुवात केली. त्यावेळी ट्रॅक्टरवर तलाठी जडे बसले होते. अचानक चालक आणि ट्रॅक्टर मालकाने तलाठ्याला जबरदस्तीने खाली ओढले आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली ओढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तलाठी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर महसूल विभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू असून अवैध वाळू माफियांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post