आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचा गौरव


खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव, दि. १४ ऑक्टोबर :
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील १३ आरोग्य सहाय्यक, एलएचव्ही व एनएम कर्मचाऱ्यांना आरोग्य विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती मिळाली असून, तसेच ७२ आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळे मागील पाच महिन्यांपासून रखडलेला या कर्मचाऱ्यांचा पगारही मार्गी लागला आहे.

या उल्लेखनीय निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय ठाकूर, महाराष्ट्र राज्य बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी संघटना (नोंदणी क्रमांक 1173/04) चे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा सरचिटणीस भालचंद्र पवार तसेच श्नामदार तडवी, आरोग्य निरीक्षक यांनी कर्मचारी संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची कार्यालयात भेट घेऊन वह्या भेट देऊन सत्कार केला.

या प्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक झाली असून, कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.”

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या वेळी सर्व पदोन्नती प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “आरोग्य सेवेत कार्यरत कर्मचारी हे गावागावात जनतेच्या आरोग्याचे खरे शिल्पकार आहेत. असेही त्यांनी सांगितले.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post