नशिराबाद टोलजवळ भीषण अपघात; बस भिंतीवर आदळली, महिला चिरडून ठार


खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - नशिराबाद टोल नाक्याजवळ बुधवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात जात असलेल्या प्रवासी बसचा समोरील एक टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस थेट टोल नाक्याजवळील भिंतीवर जाऊन जोरात आदळली. या धडकेचा जोर इतका प्रचंड होता की बसमधील एक महिला प्रवासी खिडकीतून बाहेर फेकली गेली. दुर्दैवाने ती महिला बसच्या मागील चाकाखाली येऊन चिरडली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

मृत महिलेचे नाव साराबाई गणेश भोई (वय ४६, रा. पाडळसा ता. यावल) असे आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. प्रवासी घाबरून आरडाओरड करू लागले. सुदैवाने इतर प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून मोठी जीवितहानी टळली आहे.

अपघात होताच टोल नाक्यावरील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. काही वाहनचालकांनीही जखमींना बाहेर काढून मदत केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मदत व वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय कार्यवाहीसाठी रुग्णालयात हलवला.

या अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा ताण निर्माण झाला होता; मात्र पोलिसांच्या तत्परतेने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. घटनेचा पुढील तपास नशिराबाद पोलीस करत आहेत.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post