खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शहरातील एमआयडीसी परिसरात तलवार आणि धारदार चाकूसह दहशत माजवणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी तातडीची कारवाई करत अटक केली. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे शंतनू चंद्रकांत गुरव (वय २६, रा. पंढरपूरनगर) आणि कमलेश सुरेश पवार (वय १९, रा. खेडी, ता. जळगाव) अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास एमआयडीसी परिसरात दोन तरुण हातात तलवार व धारदार चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत होते. याबाबत नागरिकांनी तात्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून एक धारदार तलवार व चाकू जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी शशिकांत मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधितांवर भारतीय दंड विधान व शस्त्र अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीव मोरे करत आहेत. एमआयडीसी पोलिसांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे संभाव्य अनुचित प्रकार टळला असून, परिसरात भीतीचे वातावरण निवळले आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------