✒️ खबर महाराष्ट्र न्यूज – मुंबई | प्रतिनिधी : राज्यातील पोलीस दलातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया अखेर सुरू होत असून आज दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. पोलीस भरती पोर्टलवर लॉगिन करून पात्र उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.
भरती प्रक्रियेची अधिसूचना काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर उमेदवार अर्ज सुरू होण्याची प्रतीक्षा करत होते. अखेर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टलवर (https://policerecruitment2025.mahait.org) अर्ज भरण्याची सुविधा आज सायंकाळी सहा वाजता सुरू होईल.
या भरतीसाठी दहावी/बारावी उत्तीर्ण उमेदवार पात्र असून, शारीरिक पात्रता व लेखी परीक्षा या दोन्हींच्या माध्यमातून निवड प्रक्रिया पार पडणार आहे. अर्ज सादरीकरणाची अंतिम तारीख लवकरच अधिकृतपणे जाहीर होणार असून उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो व सहीचे स्कॅन केलेले स्वरूप तयार ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राज्यभरातील लाखो उमेदवार या भरतीकडे उत्सुकतेने पाहत असून, पोलीस दलात सेवा करण्याचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी आता उपलब्ध झाली आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
पोलीस भरती 2025