जळगावात एकाच दिवशी दोन इलेक्ट्रिक डीपी जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात आज (मंगळवार, दि. ८ ऑक्टोबर) रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रिक डीपीला लागलेल्या आगीच्या घटनांनी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पहिली घटना रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास श्री स्वामी समर्थ चौक परिसरात घडली. खांबावरील इलेक्ट्रिक डीपीच्या मागे असलेल्या मीटरच्या पेटीला अचानक आग लागली. काही क्षणांतच पेटीने पेट घेत संपूर्ण जळून खाक झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ याबाबत वीज वितरण कंपनीला माहिती दिली. दरम्यान, एमएसईबीचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वीजपुरवठा खंडित करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दुसरी घटना दुपारच्या सुमारास घडली. संतोष सायकल मार्टच्या शेजारील घरासमोरील डिबीला अचानक आग लागल्याने परिसरात धावपळ उडाली. या ठिकाणीही नागरिकांनी तत्परता दाखवत आग पसरण्यापासून रोखली.

एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रिक डीपीला लागलेली आग ही चिंतेची बाब मानली जात आहे. याबाबत ३० नंबर ग्रुपचे वैभव पाटील यांनी माहिती दिली असून, एमएसईबीने संबंधित ठिकाणांचा तातडीने तपास करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post