खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - रामानंद नगर पोलिसांनी शहरातील एका कॉफी शॉपवर छापा टाकून तेथे सुरू असलेल्या संशयित वर्तनावर कारवाई केली. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली. संबंधित ठिकाणी कपल्ससाठी खासगी कंपार्टमेंट तयार करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी कॅफे चालवणाऱ्या मयुर धोंडू राठोड (वय २५, रा. कोल्हे हिल्स) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा तपशील असा आहे की, शहरातील गोल्ड जीमच्या पुढे ‘चॅट अड्डा’ नावाने एका गाळ्यात कॅफे सुरू होता. या ठिकाणी प्लायवुडचे कंपार्टमेंट बनवून, त्यावर पडदे लावून, खासगीपणा राखण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यासंदर्भात रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी तत्काळ गुन्हे शोध पथक रवाना केले.
उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुधाकर अंभोरे, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी आणि योगेश बारी यांनी कारवाई करून 'चॅट अड्डा' कॉफी शॉपवर छापा टाकला.
या ठिकाणी तपासणी दरम्यान काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. तसेच, कॉफी शॉपचा अधिकृत परवाना देखील लावलेला नव्हता. घटनास्थळी काही युवक आणि युवती आढळून आले असून, त्यांची विचारपूस करून त्यांना समज देण्यात आली आणि नंतर सोडण्यात आले.
या प्रकरणी मयुर राठोड याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
गुन्हा