खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जळगाव शहरातील गोपाळपुरा, जुने जळगाव येथील हेमांगी तुषार अहिरे (वय २२) या विवाहितेने तिसऱ्या मजल्यावरील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमांगी या काही कामानिमित्त तिसऱ्या मजल्यावरील खोलीत गेल्या होत्या. काही वेळानंतर त्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. नातेवाइकांनी तत्काळ त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर जीएमसी परिसरात मोठी गर्दी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक साजीद मन्सुरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------