खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - महाराष्ट्र शासनाने आज (मंगळवार, ७ ऑक्टोबर) राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निर्गमित केले आहेत. या बदल्यांमध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचाही समावेश असून त्यांची बदली नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रोहन घुगे हे जळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने प्रशासनिक फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर ही बदली केली आहे. रोहन घुगे यांनी ठाणे जिल्ह्यात विविध विकासकामांवर प्रभावी अंमलबजावणी करून ठसा उमटवला असून ते आता जळगाव जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे नेतृत्व करणार आहेत.
दरम्यान, जळगावचे विद्यमान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात विकासकामे, निवडणूक तयारी, पावसाळी आपत्ती व्यवस्थापन तसेच कायदा-सुव्यवस्था यावर यशस्वीरीत्या काम केले. त्यांचे नाशिक येथे जिल्हाधिकारीपदावर बदलीने पुनर्नियुक्ती झाली आहे.
या बदल्यांनंतर जळगाव जिल्हा प्रशासनात नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काही दिवसांत नवे जिल्हाधिकारी रोहन घुगे जळगावमध्ये कार्यभार स्वीकारतील.
Tags
जळगाव