खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर धारदार ब्लेडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१३ ऑक्टोबर) सकाळी घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून रामानंदनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप पप्पू पाटील (वय २४, रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव) हा सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास परिसरात गेला असता, भज्या कोळी या व्यक्तीने त्याच्याशी किरकोळ वाद घालून त्याचा रस्ता अडवला. वाद वाढताच भज्या कोळीने अचानक ब्लेड काढून संदीपच्या छातीवर आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाला असून नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
दरम्यान, जखमीच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसांनी आरोपी भज्या कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहेत.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------