खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - जिल्ह्यात वाढत्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे १६ ते ३० सप्टेंबरदरम्यान अवैध अग्नीशस्त्रांविरुद्ध विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस स्टेशनच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
या कारवाईदरम्यान एकूण १० देशी बनावटीची अग्नीशस्त्रे आणि २४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींविरुद्ध ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये देशी बनावटीच्या पिस्तुलांचा समावेश आहे. तपासादरम्यान काही आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघड झाले आहे.
ही मोहीम पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि कविता नेरकर (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव विभाग) तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस अधिकारी-अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा जिल्हा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
Tags
जळगाव